छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): दुकानात जाणाऱ्या विद्यार्थिनीला भरचौकात अडवून तिचा हात पकडत थेट शरीरसुखाची मागणी करण्यात आली. तसेच तू मला नकार दिला तर तुला बरबाद करेल, दुसऱ्या मुलांना बोलली तर तुझ्यासकट त्यालाही संपवून टाकीन, अशी धमकी दिली. हा प्रकार त्रिमूर्ती चौकात एका सराफा दुकानासमोर ७ एप्रिलच्या रात्री पावणेनऊ वाजता घडला. या प्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे त्याच्यावर २०२३ मध्ये पोक्सोचा गुन्हा दाखल आहे.
आरोपी मंगेश
शरीरसुखाची केली मागणी
निघाली. ती त्रिमूर्ती चौकातील एका सराफा दुकानासमोर येताच आरोपी मंगेश तिचा पाठलाग करीत आला. त्याने विद्यार्थिनीला अडवले. तू मला खूप आवडतेस, मला तुला भेटायचे आहे, तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, अशी मागणी केली. पीडितेने विरोध केला असता आरोपीने तिला धमकावण्यास सुरुवात केली. 'तू मला नकार दिला तर मी तुला बरबाद करेल, तुझ्या रूमसमोर येऊन तमाशा करेल. तुझे शिक्षण बरबाद करेल आणि तू जर कोणत्याही मुलासोबत बोललीस तर तुला आणि त्यालाही जीवे मारेन, अशी धमकीही त्याने दिली. एवढ्यावरच न थांबता त्याने भररस्त्यात पीडितेचा हात धरून ओढले आणि विनयभंग केला.
मंगेश रमेश बावस्कर (२५, रा. न्यायनगर, पुंडलिकनगर), असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिली होती समज
मंगेश बावस्कर हा रेकॉर्डवरील सराईत आरोपी असून २०२३ मध्ये त्याच्यावर पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल आहे. पीडितेसोबत इतर मित्रांच्या मध्यस्थीने ओळख झाली होती. मात्र, आरोपी मंगेश दारुडा असल्याचे समजल्यावर पीडितेने त्याच्यासोबतचा संपर्क तोडला होता. मात्र, त्यानंतरही तो तिचा पाठलाग करत होता. व यापूर्वी पोलिसांनीही त्याला एकदा समजावून सांगितले होते, अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी दिली.














